Marathi Ukhane for marriage मराठी उखाणे लग्नासाठी

Marathi Ukhane for marriage :- तुम्ही मराठी उखाणे ( Marathi Ukhane for marriage ) शोधताय का…? तर आम्ही तुमच्यासाठी येथे घेऊन आलेलो आहे ( marathi ukhane for marriage लग्न समारंभासाठी सर्वांसाठी (Marathi Ukhane for female ) उखाणे. उखाणे घ्यायची ही महाराष्ट्रातील एक गमतीशीर परंपरा आहे.

आमच्या watsup ग्रुप ला जॉइन होण्या करिता येथे क्लिक करा .

विविध समारंभात नाव घे म्हणजेच उखाणे घेत असताना विशेषतः लग्न काळात नववधू वर या दोघांनाही नातेवाईकाकडून नाव घे म्हणजे उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो. त्यामुळे जर का तुमचे नुकतेच लग्न झाले असेल तर तुम्हाला उखाणे माहित नसतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी येते घेऊन आलेलो आहे उखाण्यांचा पूर तो तुम्हाला नक्कीच आवडेल.

Marathi Ukhane for marriage

Marathi Ukhane for marriage मराठी उखाणे लग्नासाठी

याशिवाय आमच्या birthday visheshan Marathi या ब्लॉगला देखील भेट द्या.

आशीर्वादाची फुले, वेचावित वाकून,……. रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून…..!💥

आकाशात शोभते इंद्रधनुष्यांचा पट्टा…. रावांचे नाव घेते फुले आता थट्टा….!💥

चाफा बोलेना, चाफा चालेना,…….. च माझ्याशिवाय, पानच आले न….!💥

गळ्यात मंगळसूत्र, ही सौभाग्याची खून,…… रावांचे नाव घेते…. ची सून…!💥

संसाराची सुरुवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेल,….. रावांचे मी, आज पासून सर्व ऐकेन…..!💥

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात…….. आणि…… ची जोडी आहे जबरदस्त…!💥

आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे…….. रावांसाठी, सोडून आले मी सारे….!💥

तुम्ही सर्वांनी मिळून, पसंत केली आमची जोडी,……. रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी….!💥

संसारात स्त्रीने, नेहमी राहावे दक्ष…….. रावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष….!💥

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,……. रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल….!💥

सोन्याची अंगठी, चांदीचे पैजन,…… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण….!💥

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,…….. रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार….!💥

गृहप्रवेश करतानाचे उखाणे

क्रिकेटच्या मॅच मध्ये, दोन्ही ने मारले सिक्स,…….. केलं, मी सात जन्मासाठी फिक्स…..!💥

शॉपिंगला जायला, तयार होते मी झटकन,…….. चे नाव घेते तुमच्यासाठी पटकन….!💥

लग्नासाठी प्रपोज करायचं, केलं मी डेरिंग आता माझ्या जीवनाचं…… त्याच हातात स्टेरिंग….!💥

पाहताच…. ला, जीव झाला येडा पिसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापाई रिकामा होतो माझा खिसा….!💥

कॅन्टीन, हॉटेल ला ठोकला मी राम राम,………. च्या हातचं जेवण आवडते मला जाम….!💥

माझं नाव घेताना….. करते blush, लाईफ मध्ये टेन्शन सारे, होणार आता flush….!💥

उखाणा घेते मी खूपच Easy,…… राव असतात नेहमी कामांमध्ये busy….!💥

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,…….. तू मला, सुपर वुमन वाटतेस,…..!💥

माझ्या लाईफ मध्ये,…… भेटली luckily, कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली….!💥

लग्न झालं की नाव घेन, हा जणू कायदा, तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा…?💥

यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली,…….. आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली….!💥

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते,……. च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते…..!💥

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर,…….. आहे, माझ्या लाईफचा सर्वर….!💥

फेसबुक वर ओळख झाली, आणि व्हाट्सअप वर प्रेम जुळले,…… आहे किती बिनकामी, हे लग्नानंतर कळले….!💥

रोज……… म्हणून, सारखी नावाने हाक मारते, मग उखाणा घेताना……… कशाला ग खोटे खोटे लाजतेस….?💥

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफुल,…… माझी आहे,……. खरंच किती ब्युटीफूल….!💥

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम टेस्टी मसाला……… च नाव माहित आहे तरी, मला विचारता कशाला….!💥

पाण्यात घागर बुडताना, आवाज येतो बुडबुड,…….. आणि माझ्या लाईफ मध्ये, नको कुणाची लुडबुड….!💥

खेळत होतो पब्जी, आला ब्लू झोन…… च नाव घेतो, शोधून सेफ झोन…..!💥

माझ्या…… चा चेहरा, आई खूप हसरा, टेन्शन प्रॉब्लेम सगळे, क्षणामध्ये विसरा…..!💥

जमले आहेत सगळे,……. च्या दारात,…….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात…..!💥

नाचत नाचत वाजत गाजत, आली आमची वरात,……. रावांचे नाव घेते……. चा दारात…..!💥

शुभवेळी शुभ दिनी, आली आमची वरात,…… गावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात….!💥

…….. ची लेक झाली,…….. ची सून,…… च नाव घेते, गृहप्रवेश करून…..!💥

हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट,……. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट…..!💥

लग्न झाले आता, आमची भहरू दे संसार वेल,……. रावांचे नाव घेते, वाजवून….. च्या घराची बेल….!💥

सुखी ठेवत सर्वांना, ब्रह्म ,विष्णू आणि महेश,….. रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश…..!💥

त्यांचा आणि माझा संसार होईल सुकर, जेव्हा मी वी चीरेन भाजी आणि ……… हे लावतील कुकर…..!💥

रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी,…….. ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी….?💥

नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,…… च नाव घेतो, आता तरी वाट सोड….!💥

जमले आहेत सगळे…….. आमच्या दारात……. रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात….!💥

नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले,….. रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले….!💥

प्रेमळ लोकांना आवडते, लव शायरी,…….. रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी……!💥

सर्वांपुढे नमस्कार साठी, जोडते दोन्ही हात,……. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट…..!💥

इंद्रधनुष्याचे रंग आहेत सात,…….. रावांचे नाव घेऊन, पाऊल टाकते आत…..!💥

सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी,……. करते ती रावांचे नाव घेते सात जन्मासाठी….!💥

नवरदेव व नवरी साठी मराठी उखाणे

Marathi Ukhane :- या लेखात आपण नवीन व सर्वोत्तम असे महिला व पुरुषांसाठी लग्न विविध समारंभ, विशेष कार्यक्रम प्रसंगी ,उपयोगी येणारे लेटेस्ट आकर्षक मराठी उखाणे वाचणार आहोत.

काही शब्द येतात ओठातून,……. च नाव येतं मात्र हृदयातून…..!💥

निळे पाणी, निळ्या आकाश, हिरवे हिरवे रान,……… चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान…..!💥

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहो एकनिष्ठ प्रेम,……. ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम…..!💥

नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज…….. च नाव घेतो, तिला नजर नको लागू कोणाची आज….!💥

पुरणपोळी तूप असावे साजूक,…….. आहेत आमच्या नाजूक…..!💥

गाण्याच्या सुराला तबल्याची साथ……ने दिला मला प्रेमाचा हात…..!💥

तसा मला काही शोक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता…… च्या प्रेमात पडली माझी विकेट….!💥

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,……. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने…..!💥

काय जादू केली, जिंकलं मला एका क्षणात, प्रथमदर्शनीच भरली……… माझ्या मनात,💥

संसार म्हणजे, दोन घरांना जोडणारा पूल,……. च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भुल….. !💥

सीतेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखे रूप, मला मिळाली आहे…….. अनुरूप……!💥

जाई जुईचा वेल पसरला दाट,………. बरोबर बांधली जीवनाची गाठ……!💥

भाजीत भाजी मेथीची, ……. माझ्या प्रीतीची..…!💥

हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,……. मुळे मिळाले मला स्वप्न आयुष्यभराचे…..!💥

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,……. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा…..!💥

नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री,……. झाली आज माझी गृहमंत्री…..!💥

देव आमचा विठोबा, विटेवरी उभा……… मी वाढवली आमच्या घराची शोभा…..!💥

संसाररूपी सागरात पती-पत्नीची नौका,……… च नाव घेतो सर्वांनी ऐका…..!💥

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहू…….. ची जोडी….!💥

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल……… स नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल…..!💥

चांदीच्या ताटात रुपया वाचतो खनखन……… च नाव घेऊन बांधतो कंकण…..!💥

श्रीकृष्णाने केला पण रुक्मिणीलाच वरीन…… च्या सोबत, आदर्श संसार करीन…..!💥

आई वडील, भाऊ-बहीण, जणू गोकुळासारखे घर……,… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर…….!💥

पर्जन्याच्या वृष्टिने सृष्टी होते हिरवीगार,……. च्या गळ्यात घातला मंगळसूत्राचा हार…..!💥

अस्सल सोने 24 कॅरेट,………. पण माझे झाले आज अरेंज / लव मॅरेज……!💥

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…….. बरोबर बांधली जीवन गाठ….!💥

दुर्वाची जोडी वाहतो गणपतीला……….. सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला…..!💥

दो बिंदूच्या थेंबाने चमकतो फुलाचा रंग……. सुखी आहे संसारात…… च्या संघ……!💥

तिच्या अंबारीला मखमली झुल, माझी……. नाजूक जसे गुलाबी फुल…..!💥

सूर्य चंद्राला पाहून, भरती ओहोटी येथे सागराला……. ची जोड मिळाली आहे, माझ्या जीवनाला….!💥

नवग्रह मंडळात क्षणीच आहे वर्चस्व……. आहे माझे जीवन सर्वस्व….!💥

एक होती चिऊ, एक होता काऊ,…….. चे नाव घेतो डोकं नका खाऊ….!💥

श्रावण महिन्यात असतात खूप सण,……. सुखात ठेवीन हा माझा पण…..!💥

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर…….. माझी सर्वांपेक्षा सुंदर…..!💥

संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी……….. मुळे लागली मला संसाराची गोडी…..!💥

आयुष्याच्या वनावर अडचण आल्या खूप, अखेर मन प्रसन्न झाली,…… चे बघून रूप….!💥

काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनी भरली….. माझ्या मनात….!💥

दुधाचे केले दही, दयाचे केले ताक, ताकाचा तिला मठ्ठा,….. चे नाव घेतो……. रावांचा पट्टा…..!💥

मायामय नगरी, प्रेममय संसार……. च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार….!💥

प्रेमाच्या ओलाव्याने दुःख झाली कोरडी….. माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली….!💥

मंथ एंड आला की, भरपूर वाढते काम, ऑफिसमध्ये बॉस आणि घरी…… कटकट करते जाम…..!💥

मोगऱ्याची कळी उमलती असता, दरवळतो सर्वत्र सुगंध,……… च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद….!💥

दवबिंदूंनी चमकती, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात,…… च्या संग…..!💥

जगालाच श्वास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला…… प्रेम पुतळे…!💥

एक दोन तीन चार,……. वर आहे, माझे प्रेम फार….!💥

मधाची गोळी आणि फुलांचा सुगंध…… मुळे कळल मला, जीवनाचा आनंद….!💥

कळी हसून फुल उमलते, मोहरून येईल सुगंध……… च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद….!💥

राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ………… शिवाय माझं सगळं जीवन व्यर्थ…..!💥

चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ……. स नाव घेतो पुढचं नाही पाठ…..!💥