महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024 :- आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे याचे आधी नसतं आस्थापनेवरील गट ब व गट क आणि गड या संवर्गातील १) संरक्षण अधिकारी, गट ब २ पदे २) परिविक्षा अधिकारी, गट कर ७२ पदे ३) लघुलेखक, गट क एक पद ४) लघुलेखक निम्न श्रेणी, गट क २ पदे ५) वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, गट क ५६ पदे ६) संरक्षण अधिकारी गट क ५७ पदे ७) वरिष्ठ काळजी वाहक, गट – ड ४ पदे ८) कनिष्ठ काळजी वाहक गट – ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट ड ६ पदे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024

Also read प्रधानमंत्री इंदिरा गांधी योजना

सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेत शी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुण्याच्या https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर दिनांक 14 10 2024 पासून सरळ सेवा भरती 2024 यावर उपलब्ध करून दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रिया करिता केवळ मुक्त संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेल्या अर्ज परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही.

भरती प्रक्रिया संदर्भात सर्व कार्यक्रम वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येते. सदर भरती प्रक्रिया बाबत उमेदवाराशी कोणत्याही स्वातंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नसून, सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांकदिनांक 14/10/204 दुपारी 15.00 वाजेपासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचाअंतिम दिनांक दिनांक 03/11//2024 रात्री 23.55 वाजे पर्यंत
फक्त भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, त्यामध्ये अशांत बदल करणे, पदाच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे सामाजिक, समांतर, दिव्यांग व इतर सर्व आरक्षणांमध्ये संवर्गनिहाय्य पदनीय बदल करण्याचे, सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले असून त्यांचा निर्णय अंतिम राहील. तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील. त्याबाबत उमेदवारांना कोणताही हक्क दावा सांगता येणार नाही.

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024

टीप :- संरक्षण अधिकारी गट क या पदाची जिल्हानिहाय रिक्त पदाची माहिती भरती प्रक्रियेच्या नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादीनुसार संरक्षण अधिकारी या पदाकरिता निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या उमेदवारांनी नियुक्ती करिता त्यांचे पसंती क्रमानुसार पाच जिल्ह्याचे विकल्प कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

संबंधित उमेदवाराने सादर केलेले विकल्प, प्रशासकीय आवश्यकता व गुणवत्ता विचारात घेऊन संबंधित उमेदवाराची निवड संबंधित जिल्ह्यात करिता करण्यात येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये संरक्षण अधिकारी या संवर्गाचे पद रिक्त नाही अशा जिल्ह्याच्या विकल्प संबंधित उमेदवाराने दिल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

संबंधित उमेदवाराची नियुक्ती कोणत्या जिल्ह्यात करावयाची व संबंधित उमेदवारास त्यांनी सादर केलेल्या विकल्पातील जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात नियुक्ती देण्याचे सर्व अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास यांनी राखून ठेवले आहेत. संरक्षण अधिकारी या पदावर संबंधित जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर त्याची नियुक्तीच्या जिल्ह्या बाहेर बदलीस पात्र राहणार संरक्षण अधिकारी या संवर्गात नियुक्त झालेल्या व्यक्तीस त्याच्या नियुक्तीच्या जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या कार्यक्षेत्रात तालुक्यात काम करणे अनिवार्य राहील.

संरक्षण अधिकारी या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतूद क्रमांक पाच नुसार सदर पदावर नियुक्त केलेल्या उमेदवार एका वर्षाच्या कालावधीसाठी असेल नियुक्त झालेल्या उमेदवारांनी परीक्षा कालावधी समाधानकारक रीतीने पूर्ण केला नाही किंवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाला नाही किंवा पदासाठी योग्य असल्याचे आढळून आले नाही तर संबंधित उमेदवार शासकीय सेवेतून काढून टाकण्यात पात्र असेल. भविष्यात संरक्षण अधिकारी या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमत अटी व शर्तीमध्ये नियमांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेले बदल सदर पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारावर बंधनकारक राहतील.

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024

शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी व अनुभव

जाहिराती मध्ये नमूद पदाकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक ०३-११-२०२४ रोजी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य आहे.

ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप
  • संगणक आधारित परीक्षा द्वारे(computer base online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील. प्रश्नपत्रिकातील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहे.
  • ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पदाकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित कम्प्युटर बेस एक्झामिनेशन घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
  • लघुलेखक गट क (उच्च श्रेणी), लघुलेखक गट क (निम्न श्रेणी) स्वयंपाकी, गटक या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व तदनंतर व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. 120 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुणांची याप्रमाणे एकूण 120 गुणांची संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45 गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र राहतील. लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करिता शिफारस करण्यात येईल. व्यावसायिक चाचणी करिता निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवले आहे.
  • परीक्षा ही कम्प्युटर बेस्ट टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केले जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. विविध सत्रातील प्रश्नपत्रिका चे स्वरूप व त्याची काठी न पातळी तपासण्यात येऊन त्यांचे सामान्यीकरण समतुल्य करण्याबाबत संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. सदर गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी संवर्गासाठी अर्ज करावयाचा झाल्यास प्रत्येक पदासाठी संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
  • चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण मजा केले जाणार नाही.

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024

प्रक्रियेच्या कार्यपद्धती, अटी व शर्ती :-

  • प्रस्तुत भरती प्रक्रिया करिता केवळ मुक्त व नमोच संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच भरलेला अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात आलेल्या परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील, इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. विहित पद्धतीने, मुदतीत म्हणजेच दिनांक 3 11 2024 पर्यंत अर्ज व शुल्क सादर केलेल्या उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा करिता विचारात घेण्यात येतील. विहित मुदतीनंतर अर्ज व शुल्क सादर करण्याबाबतची लिंक बंद होईल.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज/ऑनलाइन शुल्क भरण्यापूर्वी सदरच्या सविस्तर जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करून आपण सादर पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहोत किंवा कसे याबाबतची खात्री करावी. तदनंतरच अर्ज परीक्षा शुल्क भरावे. सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील व कोणत्याही कारणास्तव ते उमेदवारास परत करण्यात येणार नाही. ऑनलाइन शुल्क भरताना उमेदवारास परीक्षा शुल्का व्यतिरिक्त संबंधित बँकेच्या नियमानुसार शुल्क चार्जेस करावे लागतील. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारास खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या रुपये 1000 एवढे शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाइन शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींना आयुक्त, महिला व बालविकास पुणे हे जबाबदार राहणार नाही.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता, वय, अधिवास, जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला, खेळामधील प्राविण्य, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माझी सैनिक, अनाथ, दिव्या ंग व इतर बाबी सिद्ध करणे ही सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. यापैकी संबंधित उमेदवारास लागू असलेली/ऑनलाइन अर्ज नमूद केलेली कोणतीही बाब उमेदवार सिद्ध करू शकल्यास अशा उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवले आहे.
  • फक्त नमूद पदांच्या सरळ सेवा भरती प्रक्रिये बाबतच्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा. उमेदवाराचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक, खरी व अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्याने भरती प्रक्रियेच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर त्याचा अर्ज निवड नाकारते केल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या माहिती भरती प्रक्रियेच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर बदलता येणार नाही व त्याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.
  • महिला व बालवकास विभागाची सदर जाहिरात विविध माध्यमाद्वारे प्रसारित केलेल्या सूचना, अटी व शर्तीचा भंग करणाऱ्या अथवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कोणताही गैरप्रकार करणारे, नियमांची उल्लंघन करणारे, तोतयागिरी करणारे उमेदवार संपूर्ण भरती प्रक्रियेतून अथवा भविष्यातील सर्व भरती प्रक्रियेसाठी प्रतिरोधक किंवा अपात्र करण्याचे शासकीय सेवा कोणत्याही टप्प्यावर समाप्त करण्याचे अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवले आहे.

Join watsup