वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये |Vruksharopan Nibandh in Marathi |vruksharopan essay in Marathi 2024

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये :- वृक्षरोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीव पूर्वक केलेली लागवड. झाडे नियमित मानवाचे मित्र आहे. ते निसर्गाशी परोपकारी भावना व्यक्त करतात. मानवाला त्यांच्याकडून बरेच काही मिळते. ते मानवी जीवनाचा एक आवश्यक भाग आहेत. म्हणूनच प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत वृक्षरोपण करणारा खूप महत्त्व आहे. देशात झाडे जास्त असणे हे त्याच्या आनंद सौभाग्य आणि लक्षण आहे.

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे”म्हणजे झाड आपले मित्र. हो खरंच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा सर्वात मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपले जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात. रिक्षा पासून आपणास अन्य धान्यापासून ते घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू सर्व काही मिळते.

आमच्या Watsup ग्रूप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सीजन श्वास घेऊन आपण कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतो. आज कार्बन डाय-ऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्सिजन ते सोडतात. तसेच वृक्षापासून आपणास अन्यधान्य, भाजीपाला, फळे, औषधे, इंधन, इमारती लाकूड आणि प्राप्त होते. भूमी आणि जल संरक्षणाचे काम रुक्ष करतात. पाण्याच्या दुष्काळ, पूर नियंत्रण जमिनीची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्ष मदत करतात. जमिनीचा ओलसरपणा टिकून राहण्यासाठी वृक्षांचा उपयोग होतो. हिमालयाच्या पर्वतीय भागात देवदार, बांबू, साल, साग इत्यादी वृक्ष आढळतात. अशा वृक्षांपासून आपल्याला इमारती, जहाजे इत्यादीसाठी लाकूड मिळते तसेच निसर्गाचा समतोलही राखला जातो.

औषधे तयार करण्यासाठी वृक्षांची फुले, फळे, पाने, मुळे, बिया या सर्वांचा उपयोग केला जातो. स्वादिष्ट फळे, सुगंधी फुले, वस्त्र, इंधन घर यासाठी मानव आजही वृक्षांवरच अवलंबून आहे. वृक्ष व पशुपक्षी हे परस्पर पर्यायी आहे. जिथे वृक्षांची हिरवीगार वनराई असते. तेथेच पक्षांचा किलबिलाट असतो. फक्त मनुष्याला नाही तर अनेक वन्य जीवन करता पण वृक्ष फार महत्त्वाचे काम करते.

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

अनेक पक्षी, छोटे छोटे जीव जंतू आपलं निवासस्थान झाडातच करतात. पक्षी वृक्षांवर घरटे बनवतात. जर झाड नाही जंगल नाही तर जंगली जनावर गावात शहरात घुसतील व मानव वस्तीत आणि पोहोचवतील. दैनिक कामकाजातील थकवा, मनाचा क्षण घालवण्यासाठी पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते. तेव्हा निसर्गाच्या सानिध्यातील तो आनंद काही औरच असतो. हिरव्यागार घनदाट उपसांनी आच्छादलेली पर्वतरांग मित्र सुखाचा अवरणीय आनंद देऊन जातो.

वृक्ष आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याबरोबरच कार्बन डाय-ऑक्साइड सारखे विचारू वायू शोषून घेऊन आपणास प्राणवायू देतात. दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या या वृक्षांमध्ये प्रदूषण कमी करण्याची अद्भुत क्षमता असते. वातावरण सुरक्षित, थंड, सुगंधित करण्यासाठी वृक्षाची सदनता उपयोगी ठरते.

वृक्षाचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते, फुलझाडे, सावली देणारे वृक्ष, फळझाडे या सर्व प्रकारच्या वृक्षांचा एकच उद्देश आहे, मानवाची कल्याण करणे. वृक्ष आपल्या सभोवतांचा परिसर सुंदर करतातच पण वातावरणही सुगंधित करतात. त्यामुळे शांती आणि आनंद वाटतो. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून आपल्याला सावली देतात. वनांपासून आपल्याला डिंक, लाख, कागद, रबर यांनी उपयोगी वस्तू मिळतात.

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

पण कार्ड बदलला. माणसातील माणुसकी हरवली. माणसे स्वार्थी बनू लागली. उंच इमारती बांधण्यासाठी त्यांनी झाडे तोडण्यास सुरुवात केली. रहदारी वाढली, मोठ्या रस्त्यांची निकड निर्माण झाली, तेव्हा जुने जुने वृक्ष ही तोडण्यात आले. इंधनासाठी झाडांची तोड सुरू झाली. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहे आणि यामुळे गंभीर परिणाम दिसायला लागले आहे. औषधीयुक्त वनस्पती मिळणं ही दुर्मिळ बाब झाली आहे. झाड नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. यामुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे. हे थांबवण्याकरिता नागरिकात वृक्षतोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे.

आज मानव झाडे तोडत राहतो पण ती झाडे पुन्हा लावत नाही. हिरवीगार चांगले त्याने उजाड करून टाकली आणि त्यामुळे पर्यावरणाची भयंकर समस्या आपल्यासमोर उभी राहिली. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असणारे वृक्ष आपले जीवन दाते आहेत म्हणून आपण जुन्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष दरवर्षी लावले पाहिजेत, त्यामुळे दुष्काळ आणि वाळवंटीकरणासारख्या समस्या नष्ट होऊ शकतील.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनलेली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली प्रगती साध्य केली, परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षासाठी सिमेंटची जंगल बसवली. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याचाच परिणामी ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे.

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढली. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचा, सजीवांचे अस्तित्व धोक्यात आला आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अतिवापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणे कठण झालंय. सुद्धा हवा, ऑक्सीजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुल एचडी नाही तर, आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात…… म्हणूनच वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करा.

शासकीय जंगलाखाली असणारे भूक क्षेत्र वाढावे यासाठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणा कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षरोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्षांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाही. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षरोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातीची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैरस सहकारी संस्थांचा कॉल आहे.

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

उद्देश

  • जमिनीवरील झाडांची संख्या वाढवणे
  • जीव विविधता जपण्यासाठी
  • कीटक, पक्षी, प्राणी यांना हक्काचा अधिवास निर्माण करून देण्यासाठी
  • जमिनीची धूप होऊ नये म्हणून.
  • पाणी अडवून जमिनीत जिरवता यावे
  • वाळवंटीकरण रोखण्यासाठी
  • पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी

वृक्षरोपण निबंध मराठीमध्ये

वृक्ष लागवड पुण्य कार्य :- वृक्षारोपण एक पुण्य कार्य मानले जाते. झाडांची लागवड करणे आणि त्याचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जितके एखाद्या मुलाला दत्तक घेणे आणि त्याचे पालन पोषण करणे आणि त्याचा विकास करणे. अग्निपुराणात असे म्हटले आहे की जो झाडे लावतो तो आपल्या तीस हजार इतरांचा उद्धार करतो.

झाडांमुळे कोणत्याही घराचे, बंगल्याचे सौंदर्य खुलते. एक प्रकारचा टवटवीतपणा जाणवतो. हीच बाब शहरांसाठी ही लागू आहे. ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे असतात तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर तजेलदार पणा. युरोपमधील अनेक शहरात वृक्षरोपणावर विशेष लक्ष दिले जाते. त्याची कारणच तेथील नागरिकांमधील जागरूकता असे असावे. भारतात अलीकडील काळात वृक्षरोपणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. पण त्याचे प्रमाण अपेक्षे एवढे नाही. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या मोहिमांचा अपेक्षित फायदा होत नाही. हे लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग वाढवला पाहिजे तरच खडे जगतील.

वृक्ष लागवडीचे फायदे :- माणसाला वृक्षारोपणापासून बरेच फायदे होतात. झाडांच्या फळा फुलांमुळे सुस्त ठिकाणीही सुंदर बनतात. झाडांची हिरवळ मनाला प्रसन्न करते. त्याच्या मस्त सावलीने उन्हाळ्याच्या दुपारी आनंद मिळतो. त्यांची फुले आणि त्यांची पाने आणि लाकूड आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. झाडांपासून कागद, डिंक, भौतिक औषधे आणि तेल इत्यादी मिळते.

वैज्ञानिक आणि भौगोलिक महत्त्व :- वृक्षारोपण वैज्ञानिक आणि भौगोलिक दृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे वातावरण थंड आणि शुद्ध करतात. शुद्ध हवा लोकांना निरोगी बनवते. वृक्षांच्या आकर्षणामुळे पावसाचे ढग येतात आणि दुष्काळाची भीती दूर होते. शेताभोवती झाडे लावल्यास पावसात शेताची मातीचे संरक्षण होते. आणि धान्याचे उत्पादन वाढते. रस्त्याच्या कडेला झाडे लावल्याने त्याचे सौंदर्य वाढते आणि लोकांना सावली मिळते.

प्रत्येक शहरात झाडाची संख्या त्या तुलनेत कमी आहे. त्यामागे अनेक कारणे असल्याचे लक्षात येते. पण केवळ कारणे शोधून त्यामध्येच अडकून पळण्यापेक्षा रुक्ष रोपणावर भर दिला पाहिजे. कारण झाडे जगली तरच शहराचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यात मानले पाहिजे. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक आहे. कारण महापालिका किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेने झाडे लावली तरी प्रत्येक झाडावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. नागरिकांनी सहकार्य केले तर निम्म्यापेक्षा अधिक झाडे जगू शकतील. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेसाठी सर्वांनी सहभागी व्हावे.

सारांश- निसर्गाने बनवलेले एकही झाड निरुपयोगी नाही. वृक्षरोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी सुंदर आणि आनंदी बनवते. दरवर्षी वन महोत्सव साजरा करून या योजनेत आपण सहकार्य केले पाहिजे. आज आपल्याला वृक्षरोपणाचे महत्त्व समजू लागले आहे हे आनंद दायक आहे. आज शहरांमध्ये वृक्षरोपण सप्ताह साजरा केला जातो.

नगरपालिका ही वृक्षरोपण कार्यक्रमात प्रोत्साहन देत आहेत. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्याची परंपरा देखील सुरू झालेली आहे. वृक्ष लागवड करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थानाला वृक्षमित्र पुरस्कार दिला जातो. देशात जितके हिरवेगार झाडे असतील तितके देशाचे आयुष्य अधिक हिरवे होईल यात शंका नाही. म्हणून आपण वृक्षारोपण करण्याच्या प्रवृत्तीचा उत्साहाने अवलंब केला पाहिजे.

विज्ञानाची चमत्कार निबंध