नविन गाडीचे Maintenance कशा पद्धतीने करायचे :- मित्रांनो प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या कडे एक छोटी का असेना पण एक कार असावी. हे प्रत्येकाचे स्वप्न सुधा आते , पण कार घेतल्या नंतर तिची निगा कशी राखावी ही प्रत्येकाला माहीत नसते. त्याचमुळे आज आम्ही या लेखांमध्ये नवीन गाडी घेतल्यापासून तिची निगा किंवा तिची सर्विस कशा पद्धतीने करावी याबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये देणार आहोत.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
कारची देखभाल केली नाही तर ती रस्त्यात केव्हा धोका देईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे वेळोवेळी इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर चे काम करून घ्या. बनाने जन किलोमीटरच्या आकडेवारीत पुसून जातात आणि सर्विसिंग करत नाही त्याचा त्यांना फटका बसतो. कारची नियमित सर्विसिंग अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कार अनेक वर्षे खराब होत नाही. कार मध्ये असे अनेक पार्ट्स असतात की ज्यांना वेळोवेळी बदलत राहणे आवश्यक असते. इंजिन ऑइल, एअर फिल्टर, कुलंट, ब्रेक शूज, यासारख्या वस्तू बदलत राहणे गरजेचे आहे. अनेकदा कार खरेदी केल्यानंतर ती सर्विसिंग करण्यात येते. त्यानंतर कारकडे दुर्लक्ष होते तर काहींना किती किलोमीटर कारचा वापर केला तर पाठ बदलावे, कॉल चेंज करावी याचे गणित जुळवता येत नाही.
कोणत्याही कंपनीची गाडी घेतली असता, घेतलेल्या तारखेपासून एक महिन्याच्या आत किंवा गाडी 1000 km झाल्यानंतर ज्या कंपनीमधून घेतली असता,(मारुती सुझुकी, हुंडाई, टाटा, महिंद्रा) त्या कंपनीमध्ये गाडीची पहिली सर्विस करण्याकरिता घेऊन जावे.
इंजिन ऑइल हे इंजिनच्या कामातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर इंजिन ऑइल चेंज केल्यानंतर ऑइल फिल्टर चेंज करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण नवीन ऑइल टाकले असता नवीन फिल्टर सुद्धा ट**** आवश्यक आहे. कारण इंजिन ऑइल मधून खराब घटक काढून ट**** हे ऑइल फिल्टर चे काम आहे.
New Car First service
नवीन गाडी घेतली असता तिची पहिली सर्विस ही एक दोन महिन्याच्या आत किंवा 1000 km झाल्यानंतर करून घ्यावी. यामध्ये शोरूम मध्ये गाडीचे संपूर्ण जनरल चेकअप केल्या जाते. यामध्ये कंपनीकडून कोणतेही चार्जेस आकारले जात नाही. नॉर्मली 50 ते 100 रुपये बिल काढण्यात येते.
New Car Second Service
गाडीची दुसरी सर्व्हिस(New Car Second Service) ही 10,000 km वर किंवा एक वर्षाच्या आत करावी. गाडी waranty मध्ये असल्यामुळे गाडीची सर्विस ही प्रामुख्याने संबंधित कंपनीमध्ये करावी. सेकंड सर्विस मध्ये गाडीचे ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज, एअर फिल्टर चेंज, डिझेल फिल्टर चेंज (डिझेल गाडी असल्यास) त्यानंतर गाडीचे कॅलिपर पिन ग्रीस कर केल्या जाते. एसी फिल्टर खराब झाले असल्यास ते बदलण्यात येते किंवा त्याला साफ करून पुन्हा लावण्यात येते. त्यानंतर इतर काही प्रॉब्लेम असल्यास कंपनीमधील टेक्निशियन ला सांगावे व ते त्यांच्याकडून सॉल करून घेणे. सेकंड सर्विस करत असताना कंपनीकडून फक्त पार्ट चे पैसे स्वीकारल्या जातात. सर्विस साठी कोणत्याही प्रकारचे लेबर घेतल्या जात नाही. कंपनीकडून तीन सर्विस फ्री असतात. फक्त पार्ट चे पैसे घेतले जाते लेबर चे पैसे घेतल्या जात नाही.
New Car Third service
मुख्यता थर्ड सर्विस(New Car Third service)ही सेकंड सर्विस सारखीच असते. गाडी 20000 km झाली असता थर्ड सर्विस केली जाते. यामध्ये ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज, एअर फिल्टर चेंज, कॅलिपर पिन ग्रीसिंग, एसी फिल्टर चेक, संपूर्ण गाडीचे जनरल चेकअप करणे, वॉशर टॅंक मध्ये पाणी भरणे, कुलट ची लेव्हल चेक करणे, इत्यादी कामे केली जातात. गाडीत आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर त्या कंपनीच्या टेक्निशियनला सांगून करून घ्याव्यात.
New Car 4th service
प्रत्येक कंपनीकडून कस्टमरला तीन सर्विस फ्री दिल्या जातात. ज्यामध्ये पहिली सर्विस नॉर्मल असते, पहिल्या सर्विस मध्ये गाडीचे संपूर्ण चेकअप केल्या जातील त्यानंतर गाडीत काही प्रॉब्लेम असल्यास तो सॉल्व्ह करून दिला जातो. त्याचबरोबर वॉशिंग क्लिनिंग करून कस्टमरला गाडी हॅन्ड ओव्हर केल्या जाते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्विस मध्ये कस्टमर कडून फक्त पार्ट चे पैसे घेतल्या जातात. कुठल्याही प्रकारचे लेबर चार्जेस घेतल्या जात नाही.
दुसऱ्या आणि तिसरी सर्विस संपल्यानंतर येणाऱ्या New (Car 4th service)सर्विस मध्ये खूप काही गोष्टी असतात. जसे की ऑइल चेंज,ऑइल फिल्टर चेंज, एअर फिल्टर चेंज, एसी फिल्टर चेंज, त्याचबरोबर कॅलिपर पिन ग्रीसिंग सोबत ब्रेक पॅड चेक करणे, ब्रेक पॅड वर मटेरियल कमी असल्यास ते बदलून टाकने, त्यानंतर वॉशिंग क्लीनिंग करून गाडी कस्टमरला हँड ओव्हर करणे. या सर्विस मध्ये कस्टमर कडून लेबर चार्जेस घेतल्या जाते. यामध्ये पार्टचे सुद्धा पैसे आणि लेबर चार्जेस चे सुद्धा पैसे घेतले जातात.
१.ऑइल चेंज का करावे ?
ऑइल चेंज केल्यामुळे इंजिनची लाईफ वाढते आणि इंजन चा परफॉर्मन्स वाढतो.
२. ऑइल फिल्टर का चेंज करावे ?
गाडी चालवत असताना ऑइल मध्ये हवे मधून भरपूर प्रमाणात डस्ट येतो, ते क्लीन करण्याचे काम ऑइल फिल्टर करतो.
३. एअर फिल्टर का चेंज करावे ?
जसे माणसासाठी शुद्ध हवा आवश्यक असते, त्याच पद्धतीने इंजन साठी सुद्धा शुद्ध हवा आवश्यक असते, त्यामुळे इंजिनला जेवढी शुद्ध आवाज येईल तेवढीच इंजिनची लाईफ चांगली राहणार.
३. डीजल फिल्टर का चेंज करावे ?
डीजल फिल्टर म्हणजेच फुल फिल्टर आणि विदाऊट फ्युल गाडी चालूच शकत नाही, त्यामुळे क्लीन क्युरी गाडीला मिळण्यासाठी नेहमी प्रत्येक वीस हजार किलोमीटरवर शिवल फिल्टर चेंज करणे आवश्यक आहे, अन्यथा याचा परिणाम गाडीच्या इंजेक्टरवर होऊन गाडीला धोका निर्माण होऊ शकतो आणि आपला खर्च सुद्धा वाढू शकतो. त्यामुळे नेहमी गाडीचे सर्विस करताना डीजल फिल्टर किंवा ठेऊन फिल्टर चेंज करावे.
४. कॅलिपर पिन ग्रीसिंग का करावे ?
रस्त्यावर गाडी चालवत असताना आपली कार ही 70 ते 80 किंवा त्याहीपेक्षा अधिक वेगाने धावत असते. पण अचानक समोर काही आले तर आपल्याला ब्रेक दाबावे लागतात. या ब्रेकला स्मूथ ठेवण्याचे काम कॅलिपर पिन ग्रीस करत असते. जर यांना नेहमी ग्रीसिंग करत राहले प्रत्येक सर्विस ला तर ते फ्री राहून आपले ब्रेक वेळेवर लागतात. ब्रेक व्यवस्थित काम करत नाही आणि मोठा एक्सीडेंट होण्याची शक्यता असते.
५. ब्रेक ऑइल :- ब्रेक ऑइल, ब्रेक सिस्टमला योग्यरीत्या काम करण्यासाठी मदत करते. ते ब्रेकपॅड आणि डिक्स यांच्या दरम्यानची दर्शन कमी करतो. ब्रेक ऑइल हे रेगुलर बदलणे आवश्यक नसते, फक्त त्याची लेव्हल कधी कमी होऊ देऊ नये.
६. गेअर ऑइल :- गेअर ऑइल हे गेअर बॉक्स मध्ये असून ते गेअरबक्सला स्मूथ ठेवण्याचे काम करते. त्याचबरोबर गिअर शिफ्टिंग मध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही. गिअर ऑईल प्रत्येक चाळीस हजार ते 50 हजार किलोमीटरवर चेंज करणे आवश्यक आहे. ( कॉलिटीनुसार)
७. कुलंट :- आधीच्या गाड्यांमध्ये सगळेजण फक्त पाणी टाकायचे, पण ते पाणी नेहमी नेहमी टाकत राहावे लागते. त्यामुळे कुलंट हा पर्याय आला आणि कुलट इंजिनला थंड ठेवण्याचे काम करते. कुलंट आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळेस बदलून घ्यावे.
गाडीमध्ये नेहमी कंपनीने रेकमेडेड केलेले ऑइल टाकावे, जेवढी इंजन ची कॅपॅसिटी आहे तेवढेच ऑइल टाकावे अन्यथा ऑइल सी ला कटून ऑइल लिकेज होण्याचे शक्यता वाढते. त्याचबरोबर गाडीची सर्विस करताना ओरिजनल पार्ट चा वापर करावा.
नविन गाडीचे Maintenance कशा पद्धतीने करायचे
थोडक्यात
- कारचे इंजिन ऑइल बदलण्यासाठी दहा हजार किलोमीटर किंवा बारा महिने यापैकी कोणत्याही एका कालावधीत ऑइल बदलावे लागते.
- कार मध्ये सिंथेटिक इंजिन ऑइल असल्यास तो दहा ते पंधरा हजार किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर बदला लागतो.
- काय म्हणते सामान्य इंजिन ऑइल असल्यास ते पाच ते दहा हजार किलोमीटरच्या अंतरावर बदलवा लागतो.
- कारमध्ये इंजिन ऑइल चे प्रमाण दर दोन ते तीन हजार किलोमीटरच्या अंतरावर चेक करावे लागते.
- इंडियन ऑइल ची लेवल कमी झाल्यास त्याचे टॉपअप करून घ्यावे.
- इंडियन ऑइल बदलल्यामुळे ओवर हीटिंग टाळता येते आणि गाडीचे प्रदर्शन चांगले राहते.
- इंजिन ऑइल कमी झाल्याने वाहनाची कार्यक्षमता कमी होते.
- इंजिन ऑइल ची क्वालिटी चेक करण्यासाठी गेजमधून दोन-तीन थेंब ऑइल काढावे आणि दोन्ही बोटाच्या मध्यात घेऊन ते रगडून पहावे .
- त्याची ठीक नाही व्यवस्थित असल्यास तसेच ठेवावे अन्यथा ऑइल चेंज करावे.
टीप :- वरील दिलेली माहिती ही आमच्या अनुभवानुसार आहे. प्रत्येक कंपनी आपल्या गाड्यांचे मेंटेनन्स वेगवेगळ्या प्रकारे ठेवू शकते. त्यामुळे दिलेली माहिती ही 90 टक्के बरोबर आहे. तरीसुद्धा आपल्या गाडीची संबंधित मेंटेनन्स करण्यासाठी एकदा कंपनीतील एडवायझरचा सल्ला घ्यावा.