१००+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा Diwalichya shubhechya लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा 2024

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा :- दिवाळी हा प्राचीन काळी यक्षाचा उत्सव मानला जातो. अश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकाला दिवाळीचा सण येतो. अश्विन मध्ये द्वादशी ते आर्थिक शुद्ध द्वितीय यादरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्याची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्याचा दिवस सुरू होता त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठी ते हा आनंदोत्सव साजरा करीत असावेत. असे म्हटले जाते. 14 वर्षाचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसात, अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा द्विप मांगल्याचे प्रतीक मानला जातो.

दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. या दिवाळीनिमित्त आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश……💥

अशाच नवनविन शुभेच्या साठी watsup ग्रूप जॉईन करा.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्यांचा लख्ख प्रकाशाने उजळलेली आजची रात्र आहे, आपण सर्व मिळून हा पवित्र सण साजरा करूया, कारण आज सर्व सणांमधील सर्वात मोठा सण दिवाळी आहे आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….!💥🌄

धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शौर्य लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करत लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥🌄

यशाची रोषणाई, कीर्तीचे अभंग स्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा…..!💥🌄

दिवाळी आहे पर्व सुखाच, प्रकाशाचा, लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं, या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद… लक्ष्मीपूजन, नरक चतुर्थी आणि दिवाळी पहाटेच्या मनःपूर्वक शुभेच्छा….!💥🌄

स्नेहांचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा……!💥🌄

लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी आढळून जावो, लक्ष्मीपूजनाच्या खुप सार्‍या शुभेच्छा…..!💥🌄

अभंग स्नानाने झाली पहाट, दारी रांगोळीचा थाट, सण आला प्रकाशाचा, दिव्यांची केली रास, चिवडा करंजी चकली, फटाके ही खास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा….!💥🌄

दिव्या मुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…… लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडलेल भाग यांचं दार, दिवाळी आणि लक्ष्मीपूजन च्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄

सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरे, सगळे एश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, हे दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देऊ दे…..!💥🌄

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्याचा केला थाट, अभ्यंगा ला मांडले पाठ, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या, कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारात 160, आकाश दिव्यांची झगमगाट…..! दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा….!💥🌄

लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा 2024

लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा 2024 :- दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो. हा सण भारताच्या जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा एक भारतीय सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. आनंद, सुसंवाद आणि विजयाचे स्मरण करून देणारा हा एक आनंदी क्षण की ज्याचे वर्णन प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंद उतव असे महाकाव्य रामायणात केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर मध्ये हा सण येतो.

दिवाळीचा सण पाच दिवस चालतो-धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा संपत्तीची पूजा. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. दिवाळी उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात आणि स्नान करण्यापूर्वी त्यांना सुगंधी तेल लावतात ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व पापी किंवा अशुद्धता दूर होतात.

तिसरा दिवस मुख्य उत्सव असतो. या दिवशी लक्ष्मीची पूजा एक मोठ्या भक्ती भावाने केली जाते. यालाच लक्ष्मीपूजन असेही म्हणतात. लोक नवीन कपडे घालतात, पूजा करतात आणि दिवे लावून आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात. दिवाळी उत्सवाचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा किंवा पाडवा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने विशाल गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा पराभव केला होता असे म्हणतात. गाईच्या शेणाचा वापर करून लोक गोवर्धनाची प्रतीक असलेली एक छोटी टेकडी बनवतात आणि त्याची पूजा करतात. दिवाळी उत्सवाचा पाचवा सण म्हणजे भाऊबीज…. या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी जाऊन ओवाळतात. बहिण आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर भाऊ त्यांच्या बहिणींना काहीतरी भेट वस्तू देतात….!

लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा 2024

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….! फटाके कंदील पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्या नवलाईची दिवाळी येता, आनंदले दुनिया सारी….! दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!💥🌄

उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट….. दिव्यांची आरास, फराळांचे ताट…… फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट….. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट…… शुभ दीपावली….!💥🌄

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे…….. लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे……. दीपावलीच्या शुभकणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शौर्य लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी…..! या दीपावलीच्या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करून…… दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा….!💥🌄

वाढदीवसाच्या शूभेच्छा