उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध | Unhalyachi Sutti Marathi Nibandh | Essay on Summer holiday in Marathi 2024

भाग १

उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध

उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध :- उन्हाळ्याची सुट्टी म्हणलं की आता मज्जाच असणार असं प्रत्येकाच्या मनात असते. माझ्या सुद्धा मनात खूप सारी खुशी झालेली होती कारण आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. जसे पेपर संपले आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली. तसेच माझे कॉम्पुटर क्लासेस सुद्धा सुरू होणार होते. म्हणजे या उन्हाळ्यात काहीतरी नवीन शिकायला मिळणार याची खुशी मनात होती. दरवर्षी उन्हाळ्यात ऊन खूप तापतच असते. त्यामुळे दुपारच्या टाईमला आई-बाबा घराच्या बाहेर जाण्यासाठी रागवत असतात. परंतु या उन्हाळ्यात माझे कम्प्युटर क्लासेस असल्यामुळे मला बाहेर जाण्यास मनाई नसणार त्यामुळे मी अधिकच खुश होतो.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्याकरता येते क्लिक करा.

माझी उन्हाळी सुट्टी खूप मजेशीर आणि आनंददायी असावी, अशी माझी अपेक्षा होती. सुट्टी एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपासून सुरू झाली आणि ज्या गोष्टी घडल्या, त्या अगदी स्वप्नात बघितल्या सारख्या होत्या. एप्रिल मध्येच आम्ही मामाच्या गावी गेलो. माझ्या मावशीचं मूल सुद्धा मामाकडे सुट्टीत आले होते. आम्हाला बघून आजी आजोबा, मामा मामी व मामाची मुलं खूप कोण झाले. किती मला मामाने पोहायला शिकवले. मी रोज एक तास मनमुरात पोहायचो. कोणी मला खूप आवडू लागले. तेथे रानात फिरणे, रानातील रानमेवा खाणे आणि रोज नवीन नवीन गोष्टी करणे असा आमचा रोजचा दिनक्रम होता. बाबा आमच्या सोबत नसल्याने आमच्यावर कोणतेही बंधन नव्हते.

उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध

उन्हाळ्याच्या सुट्ट्या माझ्यासाठी सर्वात प्रलंबित सुट्टी आहे. दरवर्षी मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहतो. यावर्षी मी माझी उन्हाळी सुट्टी माझ्या घरी तसेच काही दिवस माझ्या मामाच्या घरी घालवली. यावर्षी माझा वेळ आनंदाजीप्रमाणे घालवण्यासाठी मी उन्हाळी शिबिरात सुद्धा सहभागी झालो. शिबिरात नृत्य, कला, गायन, योगा आणि कराटे असे वेगवेगळे वर्ग होते. मी चित्रकला वर्गात सामील झालो. कारण चित्रकला हा माझा आवडता छंद आहे. या शिवाय मी काल्पनिक कथासह विविध पुस्तके वाचण्यात वेळ घालवला. पुस्तकांच्या वाचनाने मला माझी शब्दसंग्रह सुधारण्यास मदत झाली याशिवाय मी चित्रपटाने वेब सिरीज पाहण्यात वेळ घालवला. त्यांनी माझे केवळ मनोरंजनच केले नाही तर मला जीवनाचे काही मौल्यवान धडे ही शिकवले.

मी माझ्या आई आणि वडिलांना त्यांच्या कामात मदत केली, मित्रांसोबत खूप खेळलो आणि माझा उन्हाळ्याच्या सुट्टीचा गृहपाठ वेळेवर पूर्ण केला. तर मी माझी उन्हाळी सुट्टी अशीच घालवली. मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कुटुंबासह मौल्यवान वेळ घालवायला मिळाला.

मामी आणि आजी आम्हाला रोज नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घालायचे. घरात आमचा सर्व मुलांचा खूप गल्ला असायचा. आम्ही खूप दंगा मस्ती करायचो, क्रिकेट खेळायचो, आजी आजोबा आम्हाला संध्याकाळी देवासमोर बसून शुभम करोती म्हणायला. त्यानंतर एकत्र बसून आम्हाला छान छान गोष्टी सांगायच्या. शेजारच्या आजूबाजूचे नवीन मित्र मिळाले होते. मी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत माझ्या वेळेचा आनंद घेतला, नवीन नवीन आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहिली. आणि सुंदर आठवणी तयार केल्या, तुझ्या मला आयुष्यभर लक्षात राहतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला पोहण्याची खूप भीती वाटायची, आणि ती भीती दूर करून मामाने मला एक उत्तम पोहायला शिकवले होते.

मामाच्या गावाला माझ्या सुट्टीचा एक महिना कसा निघून गेला ते आम्हाला कळलेच नाही. आणि बाबा आम्हाला घ्यायला आले. शाळा सुरू होणार होती आणि त्यासाठी नवीन वया, पुस्तके, बॅग , कपडे व इतर शालेय उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी घरी जाणे गरजेचे होते. आम्ही घरी आलो. पण उन्हाळ्याच्या गमतीशीर गोष्टी मी कधीही विसरणार नाही आणि पुढच्या सुट्टीची नक्की वाट बघेन.

उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध

भाग २

उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध :- शाळा म्हटलं की सुट्टी आलंच आणि सुट्टी मध्ये मजा करायला सगळ्यांनाच आवडते. तुम्हा मुलांना नेहमी दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी असते त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध लिहायला सांगितलं जातो. खरंतर हा निबंध अतिशय सोपा असतो. Essay on summer holiday in Marathi मध्ये आपण आपली उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली, आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय केले, कोणत्या नवीन गोष्टी केल्या, कोणत्या नवीन ठिकाणी तुम्ही भेट दिली का, तेथील गमती जमती, कोणते खेळ खेळलोय, एखादा नवीन अनुभव तुम्हाला आला का? इत्यादी मुद्द्यांचा समावेश करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध Essay on Samar holiday in Marathi घेऊन आलेलो आहोत.

खरंतर एप्रिल महिना सुरू होतो तेव्हाच मला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागलेले असतात. यावर्षीही असेच घडले. एप्रिल महिना सुरू झाला. आमच्या शाळेत परीक्षेचे वारे वाहू लागले. मी सुद्धा अभ्यासात घडून गेलो होतो. खूप अभ्यास केला आणि सर्व पेपर अगदी सोपे गेले तरच आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घालवता येईल असे मनाला कुठेतरी वाटत होते. एका मा कोमात एक पेपर देश शेवटी तो शेवटचा पेपर दिला आणि मी आनंदाने उडी मारली. आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती!

मला आठवतंय मी त्या दिवशी अगदी आनंदातच खरी आलो होतो. घरी आल्यावर मी सर्वात प्रथम माझी डायरी घेतली. या उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची, काय काय करायचे, कोणत्या नवीन गोष्टी शिकायच्या, कुठे कुठे जायचं? या साऱ्या गोष्टींचे नियोजन मी माझ्या डायरीत सविस्तर लिहून काढले. त्यानंतर मी माझी डायरी बाबांना दाखवते. बाबांनी डायरी वाचून मला खूपच छान असे म्हणत शाबासकी दिली.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे लक्ष जास्त करून वेगवेगळे खेळ खेळण्याकडेच असते. या सुट्टीत काहीतरी वेगळे करण्याचे मी ठरवले. आमच्या घराच्या शेजारी अनेक घरे आहेत. त्यापैकी काही घरात आजी आजोबा होते. तशी त्यांची आणि माझी थोडी ओळख होतीच. मी या आजी-आजोबांना मदत करायचे ठरवले!

मी एका दिवशी एका आजी आजोबांना भेटायला जायचं. त्यांच्याशी खूप सार्‍या गप्पा मारायचे त्यना दुकानातून काही आणायचे असेल तर ते मी आणून द्यायचो. त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात हे मी जाणून घेतले. बऱ्याच आजी आजोबांनी आम्हाला खूप एकटे एकटे वाटते असे सांगितले. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांची भेट घेतल्याने त्यांना खूप बरे वाटले असे त्यांनी सांगितले. पुन्हा काही मदत लागल्यास मला नक्की सांगा. असे सांगून मी त्यांचा निरोप घेत घरी आलो.

त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मी ठरवली होती ती म्हणजे, रोजनिशी लिहायची…! आमच्या सरांनी खूप दिवसापूर्वीच आम्हाला रोज निशी लिहायला सांगितले होते. ती कशी लिहायची हे ह सांगितले होते. काही कारणाने माझ्याकडून ही गोष्ट राहून जात होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र मी रोजनिशीचे अगदी ठरवून उद्घाटन केले! दिवसभरात जे जे काही होईल, जे काही आपल्याला अनुभव येतील, ते मी डायरेक्ट लिहू लागलो. उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध (Essay on Summer holiday in Marathi ) असं शीर्षक देऊन त्याखाली या उन्हाळ्यातील गमती जमती लिहिल्या. आता रोजनिशी लिहायची सवय लागल्याने मला खूप फायदा होत आहे. रोजनिशी लिहिताना माझे मन अगदी शांत होते. दिवसभरात घडणाऱ्या गोष्टीकडे मी जाणीवपूर्वक पाहू लागलो. माझ्या सुकाही समजू लागल्या. आता मी न चुकता दररोज रोजनिशी लिहितो.

त्याचबरोबर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मित्रांबरोबर क्रिकेटही खेळलो. आम्ही सर्वांनी मिळून एक मातीचा किल्ला सुद्धा तयार केला. बाबांनी मला पोहायला शिकवले उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा अविस्मरणीय वेगवेगळ्या गोष्टी मी केल्या. नवनवीन गोष्टी शिकायला, नवे प्रयोग करायला मिळत असल्यामुळेच मला उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडते.

माझे बाबा