अशाच नवनवीन माहिती करिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ( Indira Gandhi National old age pension scheme 2024) सदर योजना केंद्र पुरस्कृत असून ती महाराष्ट्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती, निराधार, विधवा, अशा सर्व घटकांसाठी योजना राबवली जात आहे. योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे सदर योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी किंवा इतरांना लाभ मिळवून देण्यासाठी आज आपण या लेखातून योजनेचे लाभार्थी कोण, फायदे, उद्देश, लागणारी कागदपत्रे, अटी व शर्ती, पात्रता, निकष इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती पुढील प्रमाणे पाहूया.
१) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना काय आहे ?
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेमध्ये केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला रुपये 200/-प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते. यामुळे लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून रुपये 400/-प्रतिमाना रूप प्रति लाभार्थ दिले जातात. एकंदर सदर योजनेअंतर्गत 65 वर्षे किंवा त्या होऊन अधिक वयाच्या आणि दारिद्र्यरेषेखालील भारतीय नागरिकांना प्रति महिना प्रत्येक लाभार्थ्याला निवृत्ती वेतन रुपये सहाशे अदा केले जाते.
सदर योजनेस वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र, इंदिरा गांधी निराधार योजना, तसेच साठ वर्षावरील पेन्शन योजना असे देखील म्हटले जाते. या योजनेतून लाभार्थ्याची हार्दिक गरज भावी तसेच दैनंदिन जीवन चांगले जगता याव यासाठी ही योजना कार्य करते.
श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेसाठी येथे क्लिक करा.
२)इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा उद्देश –
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापन निवृत्ती वेतन योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेन्शनद्वारे आर्थिक सहाय्यक प्रदान करणे आहे. राज्यातील निराधार व्यक्तीला दरमहा निवृत्ती वेतन देणे होय.
सदर योजनेअंतर्गत 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि दारिद्र्यरेषेखालील भारतीय नागरिकांना प्रति महिना प्रत्येक लाभार्थी निवृत्तीवेतन देणे.
३) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना पात्रता निकष –
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेअंतर्गत काही पात्रता व निकष ठरवलेले असून त्यांनी कशाची पूर्तता करणे गरजेचे आहे ते पात्रता आणि निकष पुढीलप्रमाणे…
- 65 वर्ष आणि त्याहून अधिक कोळ्याच्या व्यक्ती पात्र असतील.
- दारिद्र रेषेखालील 65 व 65 वरील सर्व व्यक्ती
- राज्यातील निराधार व्यक्तीला दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येईल.
४) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अटी व शर्ती –
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे त्या पुढील प्रमाणे
- दारिद्र रेषेखालील 65 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील.
- सदर योजना सर्व प्रवर्गासाठी लागू आहे.
- कुटुंबाची उत्पन्न मर्यादा विचारात घेतली जाणार त्या त्या घटका नुसार उत्पन्न मर्यादा आहे. परंतु दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी मात्र उत्पन्न मर्यादा नाही.
- बीपीएल कुटुंबातील साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व सदस्यांसाठी पेन्शन योजना ती एका व्यक्तीपूर्ती मर्यादित नाही.
संजय गांधी निराधार योजनेसाठी क्लिक करा.
5) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी –
दारिद्र्यरेषेखालील 65 ते 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र राहील
6) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे फायदे –
- दरमहा प्रत्येक लाभार्थ्यास निवृत्तीवेतन सहाशे रुपये देण्यात येईल.
- सदर पात्र लाभार्थ्यास केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रति महाप्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.
- तसेच सदर लाभार्थी यांना राज्य शासनाच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेमधून अंतर्गत रुपये 400 दरमहा निवृत्ती वेतन मिळते .यामुळे या लाभार्थ्यास राज्य शासनाकडून रुपये 400 प्रतिमा व केंद्र शासनाकडून 200 प्रतिमा असे एकूण रुपये सहाशे प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.
- ६० ते ७९ वयोगटातील व्यक्तींना दरमहा रुपये दोनशे रक्कम दिली जाते.
- 80 पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तीला दरमहा पाचशे रुपये रक्कम दिली जाते.
7) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना अर्ज कसा करावा –
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सदर योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात.
- संपर्क कार्यालयाचे नाव -जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतात.
- आणि विहित नमुन्यात अर्ज पूर्ण भरावा.
- आणि त्याबरोबर लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
- आणि विविध नमुन्यातील अर्ज आणि सोबत सर्व लागणारी कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करा.
- त्याबरोबर तिथे फॉर्म दिल्यावर पोच पावती घ्यावी.
- तसेच पुढील प्रक्रियेसाठी पाठपुरावा देखील करू शकतात.
8) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –
- अर्जाची प्रत
- वयाचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट फोटोज
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना निष्कर्ष –
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेमध्ये आजच्या या लेखात वरील प्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे. वरील माहिती मध्ये अर्ज कसा करायचा, योजनेचे फायदे काय आहेत, अटी व शर्ती काय आहेत, लाभार्थी कोण, त्याची पात्रता काय, लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात इत्यादी सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
10) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुद्दा प्रकार निवृत्तीवेतन योजना FAQ –
१) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?
तलाठी किंवा तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज दाखल करावा.
२) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभार्थी कोण आहेत?
दारिद्र रेषेखालील 65 व 62 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील.
३) वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत रक्कम किती आहेत?
प्रतिमा हा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन रुपये सहाशे देण्यात येते.
थोडक्यात :- अटी व शर्ती
- किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
- लाभार्थ्याची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात यावा.
- मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यात यावी.
- मुलीच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तिला नोकरी मिळेपर्यंत लाभ मिळेल. या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या अविवाहित मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करून लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात यावी..
- मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात यावे.
- लाभार्थ्याच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 21 हजार रुपये पर्यंत असल्यास लाभार्थी योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होईल.
- या योजनेखाली लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचा अपत्य संख्येची अट राहणार नाही.
- शारीरिक छळवणूक झालेल्या आता बलात्कार झालेल्या अत्याचारी स्त्रियांच्या बाबतीत जिल्हाशल्यचकित्सक व महिला बालविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
- घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया, ज्या पती-पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांनारीतसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत्व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलची संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी दिलेले व तहसीलदारांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- घटस्फोट झालेल्या परंतु पोरगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोरगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोरगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
- वैशा व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत, महिला व बालविकास अधिकाऱ्याचे अशा महिलेला वैशा व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अनाथ मुले मुली म्हणजे आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात राहणारे मुले मुली यांना लाभ मिळेल. आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबद्दल तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. अनाथ मुले मुलींना देय असलेले अर्थसाहाय्य हे लाभार्थी सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल.
- विधवा ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील. पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषदेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहील.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी जमीन आहे किंवा नाही याचा विचार न करता उत्पन्न मर्यादा रुपये 21 हजार रुपये असेल तर लाभ मिळू शकेल.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेखाली लाभ मिळण्यासाठी त्या लाभार्थ्याचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक राहील. मात्र त्याचे जमीन व अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न विचार घेण्यात येऊ नये. याचा अन्वयार्थ सध्या अस्तित्वात असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभ पुढे चालू ठेवण्यात यावा.
- शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेल्या व्यक्ती विशेष सहाय्याच्या या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये यापुढे फक्त दारिद्र्यरेषेच्या खालील कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 65 वर्षावरील लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निकष केंद्र शासनाने विहित केलेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये सामावून घेतले जाईल. ज्या लाभार्थ्याची कुटुंब दारिद्र रेषेखालील यादीत आहे, फक्त तीच लाभार्थी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये यापुढे लाभ मिळण्यास पात्र ठरतील. परंतु सध्या लाभ मिळणाऱ्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कमी करता येणार नाही.
- एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पर्ण कराव्या लागणार